दीड कोटींच्या ड्रग्जसह दोघांना अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

तब्बल दीड कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसह २ सराईत आरोपींना गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी सोमवारी अटक केली अाहे. सलीम अहमद खान व नूरील हुदा समशुद्दीन अली शेख अशी अारोपींची नावे अाहेत.

 

६९०५ ग्रॅम एमडी हस्तगत

नागपाडा परिसरात राहणारे हे दोघे ड्रग्जची तस्करी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. नागपाडा येथून वांद्रे सी लिंक येथील नर्गिस दत्त झोपडपट्टी येथे अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी दोघेही येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे प्रभारी पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार  पोलिसांनी सापळा रचला.  दोघे त्या परिसरात संशयितरित्या फिरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांजवळ पोलिसांना ६९०५ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले.

 घरातून २०१२ ग्रॅम ड्रग्ज जप्त

 दोघेही नागपाडा परिसरात राहणारे असून दोघांच्या घरातून पोलिसांनी २०१२ ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केले आहे. या ड्रग्जची किंमत १ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यांच्या एका साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. दोघांविरोधात अंमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने त्यांना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  


हेही वाचा -

महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक

मालाडमध्ये फ्लेमिंगोची शिकार! सहा जण ताब्यात


पुढील बातमी
इतर बातम्या