महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक


महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक
SHARES

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात रिक्षा चालकाला परवाना मागितल्याच्या राग अनावर झाल्याने त्याने महिला पोलीस शिपाईचा गैरवर्तन केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. मोहम्मद कलीम अब्दुल हालीम (३८) असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या रिक्षा चालकाकडून एक बोगस पत्रकाराचं ओळखपत्र जप्त केलं आहे.


संपूर्ण प्रकार

अंधेरीच्या डीएननगर वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस मिनाज शब्बीर सदे (३४) शुक्रवारी सकाळी ७ वा. अंधेरीच्या बाळासाहेब देवरस मार्गावरील लोखंडवाला सर्कल येथे कार्यरत होत्या. त्यावेळी आरोपी रिक्षा चालकाने सिग्नल तोडल्यामुळे मिराज यांनी त्यांला अडवलं. यावेळी मिराज यांनी मोहम्मदला परवाना दाखवण्यास सांगितला.

मात्र त्याचा परवाना मुदत संपल्याने मिजार यांनी मोहम्मदला दंड भरण्यास सांगितलं. यावरून मोहम्मदने मिराज यांच्याशी वाद घातला. त्यावेळी राग अनावर झालेल्या मोहम्मदने मिराज यांचा हात पकडून जबरदस्तीने परवाना हिसकावून घेतला. ऐवढ्यावरच न थांबता मोहम्मदने आपण आझाद सत्ता या पेपरचा पत्रकार असल्याचं सांगून मिराज यांना त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन आरडाओरडा करू लागला.


मोहम्मद पोलिसांच्या ताब्यात

याबाबत मिराज यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोहम्मदला ताब्यात घेतलं. याप्रकरणी मोहम्मद विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा