सचिन वाझे, काझी पाठोपाठ विनायक शिंदे बडतर्फ

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि लखन भैया बनावट चकमक प्रकरणात शिक्षा भोगत असलेला पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे य़ाला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. याआधी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाज काझी यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना अटक केली होती. विनायक शिंदे याने सचिन वाझेंसोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसचा संशय अधिक होता. नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात देखील प्रदीप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला होता. यानंतर विनायक शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले. विनायक शिंदे मे २०२० पासून पॅरोलवर होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही विनायक शिंदेचा सहभाग होता की याबाबत तपास केला जात आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षत सचिन वाझे यांना नुकतंच पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यापाठोपाठ एनआयच्या अटकेत असलेले वाझे यांचे सीआययूतील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांनाही पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. 



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या

पुढील बातमी
इतर बातम्या