अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण, कांबळीच्या पत्नीवर गुन्हा दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • क्राइम

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. कारण गायक अंकित तिवारीचे वडील राजेंद्र कुमार तिवारी (५८) यांनी कांबळी आणि त्यांच्या पत्नीवर मारहाणीचा आरोप करत त्या दोघांविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल केलं आहे. दरम्यान आपणही क्रॉस एफआरआय दाखल करणार असल्याचं विनोद कांबळींनी म्हटलं आहे. 

संपूर्ण प्रकार

रविवारी दुपारी विनोद कांबळी, पत्नी अँड्रियासोबत इनऑर्बिट मॉलमध्ये गेले होते. त्याचवेळी राजेंद्र तिवारी, मुलगा अंकुर तिवारी, पत्नी आणि मुलांसह मॉलमध्ये गेले होते. दरम्यान राजेंद्र तिवारी असभ्य करत असल्याचा आरोप विनोद कांबळींची पत्नी अँड्रियाने केला. मात्र अंकूर तिवारीने त्यांच्या वडिलांवर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 

काय म्हणाला अंकूर?

अंकूरचं म्हणणं आहे, 'रविवारी मॉलमध्ये गर्दी होती. त्यावेळी वडील माझ्या मुलीला गेमिंग झोनकडून फूड कोर्टकडे घेऊन चालले होते. याच दरम्यान, कांबळींच्या पत्नीला माझ्या वडिलांचा चुकून हात लागला. ते त्यांनाही कळलं नव्हतं. त्यावेळी विनोद कांबळींनी माझ्या वडिलांच्या तोंडावर मुक्का मारला, माझ्या वडिलांनाही काय होतंय हे समजलं नाही. हा सर्व प्रकार माझ्या वडिलांनी मला सांगितला. त्यानंतर मी कांबळी दाम्पत्याशी यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. शिवाय कांबळीच्या पत्नीने चपलेनं मारण्याची धमकीही दिली’ 

या प्रकारानंतर राजेंद्र यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. राजेंद्रकुमार निवृत्त बँक कर्मचारी आहेत. तर अंकुर हा पेशानं व्यावसायिक गायक आहे.

काय म्हणाले कांबळी?

'त्या वृद्ध व्यक्तीने माझ्या पत्नीशी असभ्य वर्तन केलं. त्याच्याविरोधात क्रॉस एफआरआय दाखल करणार' असल्याचं कांबळी यांनी सांगितलं.


हेही वाचा -

विनोद कांबळीचं संजू सॅमसनला 'अोपन चॅलेंज'!


पुढील बातमी
इतर बातम्या