Advertisement

विनोद कांबळीचं संजू सॅमसनला 'अोपन चॅलेंज'!


विनोद कांबळीचं संजू सॅमसनला 'अोपन चॅलेंज'!
SHARES

या मोसमात अायपीएलमध्ये शतक ठोकून दाखव अथवा मिळालेली अाॅरेंज कॅप सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला दे, असं अोपन चॅलेंज भारताचा माजी फलंदाज अाणि मुंबईकर विनोद कांबळीनं राजस्थान राॅयल्सचा फलंदाज संजू सॅमसनला दिलं अाहे. अायपीएलचे काॅमेंटेटर २३ वर्षीय संजू सॅमसनची जरा जास्तच स्तुती करत असल्यामुळे विनोद कांबळीनं या वादाला सुरुवात केली अाहे. त्यामुळे कांबळी अाणि चाहत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी रंगली अाहे.


 

सॅमसन अाॅरेंज कॅपचा मानकरी

दोन अर्धशतकांसह नाबाद ९२ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने अातापर्यंत सहा सामन्यात सर्वाधिक २३९ धावा फटकावत अाॅरेंज कॅप पटकावली अाहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला (२३० धावा) अाॅरेंज कॅप मिळवण्यासाठी फक्त १० धावांची अावश्यकता अाहे. त्याचबरोबर राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीही २३१ धावांसह अाॅरेंज कॅपच्या शर्यतीत अाहे.


काय म्हणाले विनोद कांबळी...

संजू सॅमसनविषयी काॅमेंटेटर जरा जास्तच चर्चा करत अाहेत. हे सर्व बोअरिंग वाटत अाहे, असं ट्विट विनोद कांबळीने केल्यानंतर काही फॅन्सनी त्याला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कांबळीनं संजू सॅमसनला खुलं अाव्हान दिलं. सॅमसन जर दर्जेदार खेळाडू असेल तर त्याने यंदाच्या अायपीएलमध्ये शतक झळकावून दाखवावं. जर तसं केलं तर सॅमसन हा स्पेशल प्लेयर अाहे, असं मी मानेन. संजू सॅमसनला शुभेच्छा, अशा शब्दांत कांबळीनं सॅमसनला अाव्हान दिलं अाहे.

 

हेही वाचा -

विनोद कांबळीही प्रशिक्षकाच्या भूमिकेत?

तेरी मेरी यारी... अखेर सचिन, विनोदमधील मतभेद दूर

'सचिन' नंतर आता 'विनोद'नेही गायलं गाणं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा