Advertisement

विनोद कांबळीही प्रशिक्षकाच्या भूमिकेत?


विनोद कांबळीही प्रशिक्षकाच्या भूमिकेत?
SHARES

अायपीएलच्या धर्तीवर रंगणाऱ्या मुंबई टी-२० लीगमध्ये एखाद्या संघाने मला प्रशिक्षकपदाची अाॅफर दिली तर मी प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक अाहे. याअाधीही मी प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते. गेल्या १५ वर्षांत मी क्रिकेटचे जे काही तंत्र अात्मसात केलं अाहे, त्या अनुभवाचा फायदा युवा खेळाडूंना करून देण्यासाठी मी उत्सुक अाहे, असं सांदत अापण प्रशिक्षकपदासाठी तयार असल्याचं भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीनं सांगितलं.

सध्याचे युवा फलंदाज अनेक टी-२० सामन्यात खेळतात, पण मुंबई टी-२० लीग ही युवा खेळाडूंसाठी मोठी संधी असेल. या स्पर्धेत खेळून ते अापले कौशल्य सर्वांसमोर दाखवतील. मुंबईकडे अफाट गुणवत्ता अाहे, या स्पर्धेद्वारे मुंबईला टी-२० तही चांगले खेळाडू मिळतील, अशी अाशा अाहे. 


अायपीएलसाठी पहिली पायरी

मुंबई टी-२० लीगद्वारे मोठ्या स्पर्धांसाठी सज्ज होण्याची संधी युवा खेळाडूंना मिळेल. माझ्या मते, त्यांच्यासाठी ही अायपीएलकरिता पहिली पायरी ठरणार अाहे.


कुठलीही खंत नाही

अामच्या काळात अायपीएलसारख्या टी-२० स्पर्धा नसल्याचा कोणताही पश्चाताप मला होत नाही. टी-२० स्पर्धांमध्ये सध्याचे फलंदाज जे काही फटके मारतात, ते सर्व फटके मी माझ्या कारकीर्दीत लगावले अाहेत. त्यामुळे अामच्या काळात अशा स्पर्धा नसल्याची कोणतीही खंत मला वाटत नाही, असंही कांबळी यानं सांगितलं.हेही वाचा-

आता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा