आता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा

  क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत अाता अायपीएलच्या धर्तीवर टी-२० लीग होणार असून गुरुवारी या मुंबई टी-२० लीगची अधिकृत घोषणा करण्यात अाली. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-राॅबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असून 4 जानेवारीपासून सुरुवात होणार अाहे.

  BKC
  आता मुंबईची स्वत:ची टी-२० लीग, ४ जानेवारीपासून रंगणार स्पर्धा
  मुंबई  -  

  क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत अाता अायपीएलच्या धर्तीवर टी-२० लीग होणार असून गुरुवारी या मुंबई टी-२० लीगची अधिकृत घोषणा करण्यात अाली. अनुभव अाणि गुणवत्तेची खाण असलेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटूंना अापले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई टी-२० लीगच्या रूपाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले अाहे. अाज या स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात अाले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-राॅबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असून सर्वाधिक गुण मिळविणारे दोन अव्वल संघ अंतिम फेरीत मजल मारतील.


  ४ ते ९ जानेवारीदरम्यान स्पर्धा

  मुंबई टी-२० लीगचा उद्घाटन सोहळा २ जानेवारी २०१८ रोजी रंगणार असून ४ जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर दिवसाला प्रत्येकी तीन सामने खेळविले जातील. त्यानंतर ९ जानेवारीला अंतिम सामन्याचा थरार रंगेल.


  कोणकोणते संघ?

  मुंबई टी-२० लीग ही सहा विभागांमध्ये खेळविण्यात येईल. मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्ये, मुंबई दक्षिण अाणि मुंबई दक्षिण मध्य असे सहा झोन या स्पर्धेसाठी असतील. एमसीए मुंबईतील अायपीएलसहित सर्वोत्तम खेळाडूंची यादी तयार करेल. सेंट्रल प्लेयर पूलद्वारे खेळाडू संघात सामील होतील.


  बाॅलीवुड अभिनेते उत्सुक

  मुंबई टी-२० लीगची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी बाॅलीवुडमधील अनेक स्टारमंडळी तसेच बलाढ्य काॅर्पोरेट्स संस्थाही उत्सुक अाहेत. मात्र त्याविषयीची बोलणी अंतिम टप्प्यात अाहेत. सध्या भारताचे दिग्गज क्रिकेटपटू दक्षिण अाफ्रिका दौऱ्यावर जाणार अाहेत. पण पुढच्या वर्षी त्यांनाही या स्पर्धेत खेळविण्यासाठी अाम्ही उत्सुक अाहोत, असे एमसीएचे अध्यक्ष अाशिष शेलार यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.