Advertisement

तेरी मेरी यारी... अखेर सचिन, विनोदमधील मतभेद दूर


तेरी मेरी यारी... अखेर सचिन, विनोदमधील मतभेद दूर
SHARES

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा जुना जिवलग मित्र विनोद कांबळी यांच्यातील मतभेद दूर झाल्याचं चित्र नुकत्याच एका कार्यक्रमात दिसून आलं. सचिन आणि विनोद हे दोघेही एकाच शाळेत शिकले. या दोघांचे कोचही एकच ते म्हणजे रमाकांत आचरेकर. सुरुवातीला हे दोन्ही खेळाडू मुंबईसाठी एकत्रित खेळले. शाळेमधून क्रिकेट खेळताना या दोन जोडीने नाबाद 664 धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड केला होता. पण पुढे यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने हे दोन्ही जीवलग मित्र दुरावले.



आता हे मतभेद कमी होताना दिसत आहे. कारण हे दोन्ही खेळाडू वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या क्रिकेटवर आधारीत पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान एकत्रित दिसले. विनोद कांबळीने सचिनसोबतचा एक फोटो देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत कांबळीने लिहले आहे, 'ते स्वप्नांचे दिवस, ते पुस्तकांचे दिवस, प्रश्नांची रात्र आणि उत्तरांचा दिवस असेच खेळत खेळत आम्ही मोठे झालो, आमची मैत्री अशीच कायम राहू दे''

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा