Advertisement

'सचिन' नंतर आता 'विनोद'नेही गायलं गाणं


'सचिन' नंतर आता 'विनोद'नेही गायलं गाणं
SHARES

काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरने  इंडियन आयडॉल ९ च्या फायनलमध्ये त्याच्या आवाजात गायलेलं गाणं लाँच केलं. क्रिकेटच्या मैदानावर अनेक रेकॉर्ड्स केल्यानंतर आता सचिन गायकाच्या रूपातही आपल्या चाहत्यांच्या समोर आला आणि  प्रेक्षकांना त्याचा हा अंदाजही आवडला. त्याच्या मागोमाग अाणखी एक माजी  क्रिकेटरचे गाणं गाताना एैकायला मिळणार आहे. विनोद कांबळीही आता गाणं गायला सज्ज झालाय. शालिन वैद्य निर्मित आणि जैनेंद्र बक्षी दिग्दर्शित 'असा मी मी असा' हे गाणं विनोद कांबळी याने गायलय.


या गाण्याबद्दल विचारले असता ,"एक (सिंगल) गाणं  व्यक्त होण्यासाठी नेहमीच  चांगला पर्याय असतो आणि तो खूप मजेशीर आणि मनोरंजक असतो." असं तो म्हणाला. एक क्रिकेटर म्हणून विनोद कांबळीने आतापर्यंत प्रेक्षकांची पसंती मिळवली आता त्याने गायलेलं गाणं प्रेक्षकांना किती आवडतंय हे लवकरच समजेल. 

त्या गाण्याचा टीजर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

https://www.youtube.com/watch?v=E1eA5fD3WF8 


संबंधित विषय
Advertisement