घातवार! बेस्ट बसनं तरुणीला चिरडलं

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • क्राइम

शुक्रवारी सकाळी कुर्ला बस आगारात बेस्ट बस मागे घेताना दोन बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाला. त्या तरुणीचं नाव अमरिन सबा मुर्तीजा शेख (22) असं आहे.

महिलेचा जागीच मृत्यू

कुर्ला येथे 320 क्रमांकची बेस्ट बस वाहकाकडून मागे घेण्यात येत होती. त्यावेळी मागे आणखी एक बेस्ट बस उभी होती. या दोन बेस्ट बसच्यामधून अमरिन ही तरुणी जात होती. त्याचदरम्यान 320 बेस्ट बस अचानक मागच्या बेस्टवर धडकली आणि यात ती तरुणी चिरडली. दरम्यान त्या तरुणीला उपचारांसाठी कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला.  

गुरुवारही अपघातवार

गुरुवारी ठाण्यातील सटीस पुलावर दोन एसटी बस गाड्यांची टक्कर झाली नि यात 28 प्रवासी जखमी झाले. त्यानंतर धारावीत एका तरुणीने 8 जणांना चिरडलं. तर गुरुवारी रात्री उशिरा सानपाडा येथे एसटी बस उलटून 5 प्रवासी जखमी झाले. तर गुरुवारी सुरू झालेला या अपघाताचं सत्र शुक्रवारी कुर्ल्यातील अपघाताद्वारे सुरूच आहे.


हेही वाचा -

सायन पनवेल मार्गावर बसचा भीषण अपघात, 5 जखमी

पुढील बातमी
इतर बातम्या