'तिने' ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं, ९ जणांना उडवलं


'तिने' ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबलं, ९ जणांना उडवलं
SHARES

धारावी पोलिसांनी १९ वर्षांच्या लाॅ स्टुडंटला बेदरकारपणे वाहन चालवत ९ जणांना उडवल्याप्रकरणी अटक केली. धारावी सिग्नलजवळ मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. सिग्नलला थांबण्यासाठी या तरूणीने ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबत समोर आलेली स्कूटर चालक, आॅटो रिक्षा आणि पादचाऱ्यांना उडवलं. या अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यात एका चिमुकलीचाही समावेश आहे.


'असा' झाला अपघात

ध्रुवी जैन असं या तरूणीचं नाव असून ती काळबादेवी इथं राहणारी आहे. ध्रुवी सध्या लाॅ अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ध्रुवी तिच्या ३ मैत्रीणींसोबत वांद्रे इथं बोलेरो कारमधून जात होती. त्यावेळी आंबेडकर गार्डन, वाय जंक्शन, सायन रोड इथं सिग्नल लागल्यामुळे कार थांबवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी ध्रुवीने चुकून अॅक्सिलेटर दाबल्याने हा अपघात झाला.


कुणाची तक्रार?

अपघातात जखमी झालेल्या साजिदा समिर खान (२६) पती अर्शद सैयद(३८) आणि ३ वर्षीय मुलगी फातिमा यांच्यासोबत रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. त्यानंतर साजिदा यांनी ध्रुवी विरोधात धारावी पोलिसांत तक्रार दाखल केली.


जामीन मिळाला

या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी ध्रुवीला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला. ध्रुवीने मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र तपासणी वेळी काहीच निष्पण्ण न झाल्याने ध्रुवीला जामीन देण्यात आला.



हेही वाचा-

'ते' परदेशी नागरिकांच्या क्रेडिट कार्डचा डेटा चोरायचे

खारमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा