खारमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या?

खारमध्ये वृद्ध दांपत्याचे मृतदेह गुरूवारी सकाळी संशयास्पद आढळून आलेत. नानक मकिजा (85), दया मकिजा (81) अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खारमध्ये वृद्ध दाम्पत्याची हत्या?
SHARES

खारमध्ये एकता डिलाईट या इमारतीत राहणाऱ्या वृद्ध दांपत्याचे मृतदेह गुरूवारी सकाळी संशयास्पद आढळून आलेत. नानक मकिजा (८५), दया मकिजा (८१) अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी खार पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



गळा आवळून हत्या

मकिजा हे वृद्ध दाम्पत्य मागील अनेक वर्षांपासून खार पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या एकता डिलाइट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांना दोन मुलं असून यातील एक मुलगा व्यवसायाच्या निमित्ताने सिंगापूर आणि दुसरा अमेरीकेला असतो. घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरलेल्या चोरांनी त्यांची गळा दाबून हत्या केल्याचं प्राथमिक माहितीत पुढे आलं आहे.


पोलिसांचा तपास सुरू

दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येमागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सुरक्षा रक्षक आणि घरात काम करणाऱ्यांकडे चौकशी सुरू केली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी इमारत परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा - 

वर्सोवा समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

लैंगिक अत्याचार करून तरुणाची हत्या



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा