लैंगिक अत्याचार करून तरुणाची हत्या


लैंगिक अत्याचार करून तरुणाची हत्या
SHARES

तरुणावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार परळमध्ये उघडकीस आला आहे. जिश्रायेल मरांडी (23) असं मृत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येनंतर त्या तरुणाचा मृतदेह इमारतीवरून खाली फेकत त्याने आत्महत्या केल्याचं भासवून मारेकऱ्यांनी पोलिसांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला.


मृतदेह नग्न अवस्थेत सापडला

सेनापती बापट मार्ग येथे बांधकाम सुरू असलेल्या 'द पार्क' या इमारतीत जिश्रायेल मरांडीही काम करत होता. शनिवारी रात्री जिश्रायेल मरांडी याचा मृतदेह नग्न अवस्थेत इमारतीच्या मागच्या बाजूस इतर कामगारांना आढळून आला. याबाबतची माहिती कामगारांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर ना.म.जोशी मार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आला.


अनैसर्गिक अत्याचार

मरांडीच्या टाळूच्या शेजारी गंभीर जखम होती. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत्यूपूर्वी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचंही स्पष्ट झालं असून तो नियमित समलिंग संबंध ठेवत असल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समलिंगी संबध ठेवणाऱ्या व्यक्तीनेच मरांडीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

वैद्यकीय अहवालानंतर अखेर रविवारी मरांडी याच्या मृत्यूप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. जिश्रायेलला मारेकऱ्यांनी 12 व्या मजल्यावरून खाली टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण इमारतीच्या 12 व्या माळ्यावर त्या ठिकाणी अगदी चिंचोळी खिडकी असून त्यातून त्याला खाली फेकण्यात आल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा