वर्सोवा समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू


वर्सोवा समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
SHARES

वर्सोवा समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला अाहे.  मृतांमध्ये एका तरुणीचा समावेश आहे. फजल सय्यद (१७ ) व शिफा शेख (१८) अशी मृतांची नावे आहेत.


मंगळवारी रात्री बेपत्ता 

साकीनाका येथील रहिवासी असलेले हे दोघे त्यांच्या दोन मित्रांसोबत वर्सोवा येथील चार बंगला चौपाटी येथे मंगळवारी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोन मित्र परत आले.  पण शिफा व फजल दोघेही तेथेच थांबले. मंगळवारी दोघेही घरी परतले. मात्र, शिफा व फजल न परतल्यामुळे अखेर कुटुंबियांनी साकीनाका पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार केली. मंगळवारी रात्री वर्सोवा समुद्र किनारी फजलचा मृतदेह सापडला. 

त्यानंतर बुधवारी सकाळी जुहू पोलिसांच्या हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर शिफाचाही मृतदेह सापडला. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. कुटुंबियांच्या जबाबानुसार त्यांचा कोणावरही संशय नसून दोघांचाही मृत्यू बुडून झाल्याचा अंदाज आहे.



हेही वाचा -

बँक अाॅफ महाराष्ट्रच्या एमडींना अटक, डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याचा अारोप

आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर बलात्कार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा