आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर बलात्कार


आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर बलात्कार
SHARES

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीशी मैत्री करून तिचं अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी 20 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. आदीत्य गुप्ता असं या तरुणाचं नाव असून तो 2007 नध्ये कलर्स टीव्हीवरील 'इंडिया गॉट टेलेन्ट' या कार्यक्रमात सहभागी झाला होता.


संपूर्ण प्रकार

अंधेरी परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी 17 जून रोजी पुस्तक घेण्यासाठी मोठ्या बहिणीसोबत घराबाहेर पडली होती. पुस्तकं घेतल्यानंतर पीडित मुलीची मोठी बहीण काही कामानिमित्त बाहर जाणार असल्यानं तिने लहान बहिणीला घरी जाण्यास सांगितलं. मात्र रात्री उशिर झाला तरी मुलगी घरी पोहचली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी अखेर डी.एन.नगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. 

या मुलीचा शोध घेण्याचं काम डी.एन.नगर पोलिसांसह गुन्हे शाखा 9 चे अधिकारीही करत होते. 18 जून रोजी गुन्हे शाखेचे पोलिस मुलीचा शोध घेत असताना. पीडत मुलगी त्यांना अंधेरीतील मॅकडोनल्ड येथे आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी तिला भाभा रुग्णालयात पाठवले.


मुलीवर लैंगिक अत्याचार

वैद्यकिय तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेत तिचा जबाब नोंदवला. त्यामध्ये मुलीने आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली. 


इन्स्टाग्रामवर झाली ओळख

नालासोपारा परिसरात राहणाऱ्या आदित्य गुप्ता याच्याशी पीडित मुलीची 3 महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यावेळी गुप्ताने तरुणीला रविवारी भेटायला बोलवत, तिला नालासोपारा येथे नेत तिच्यावर अत्याचार केले. मुलीनं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदीत्यला नालासोपारा येथून अटक केली असून त्याचा ताबा आता पुढील तपासासाठा डी.एन.नगर पोलिसांना दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा