मुंबई : गोवंडीत वादातून तरुणाची हत्या

कारने दुचाकीला धडक दिल्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना मुंबईतील (mumbai) गोवंडी परिसरात घडली. शिवाजी नगर (shivaji nagar) पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

गोवंडी (govandi) परिसरात गाडीला धडक दिल्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून दोन भावांनी चालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. एका कारने दुचाकीला धडक दिल्याने वादाला सुरुवात झाली होती.

त्यामुळे दुचाकी एका महिलेच्या अंगावर पडली, त्यात ती किरकोळ जखमी झाली. या घटनेनंतर, तणाव वाढला कारण जखमी महिलेने आपल्या मुलांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर वाद वाढला आणि शेवटी दोन्ही भावांनी ड्रायव्हर आदिलच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी खुनाचा (murder) गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिलच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आदिल गंभीर जखमी झाला. आदिलला तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजी नगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. मात्र तोपर्यंत दोन्ही आरोपी फरार झाले होते. अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी अब्दुल शेख आणि शरीफ शेख या दोन्ही आरोपींना लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अटक केली. सध्या पोलिस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.


हेही वाचा

मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये 350 टक्क्यांनी वाढ

पश्चिम रेल्वेवरील लोकलचा स्पीड वाढणार

पुढील बातमी
इतर बातम्या