मुंबईत (mumbai) सायबर गुन्ह्यांमध्ये (cybercrimes) लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षी 11 महिन्यांत नागरिकांचे तब्बल 1,181 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2023 च्या तुलनेत यात 350 टक्क्याने वाढ झाली आहे.
10 डिसेंबर रोजी गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी लोकसभेत काही आकडेवारी सादर केली. ते म्हणाले की, 2021 मध्ये लाँच करण्यात आलेल्या सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड रिपोर्टिंग (online scam) आणि मॅनेजमेंट सिस्टममध्ये देशभरात 9.9 लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
मुंबईत एकूण 8% किंवा 77,331 तक्रारी दाखल झाल्या आहेत. शहराच्या 1930 या सायबर क्राइम हेल्पलाइनवर कॉल्समध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. 2023 मध्ये या कॉल्सची 91,000 इतकी आकडेवारी होती. मात्र नोव्हेंबर 2024 पर्यंत ही आकडेवारी 5 लाखांहून अधिक संख्येवर पोहोचली आहे.
नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त 139.15 कोटी रुपये म्हणजेच एकूण चोरीच्या (fraud) रकमेपैकी 11.77% वसूल केले गेले आहेत. हे 2023 मध्ये वसूल झालेल्या 26.52 कोटी रुपयांपेक्षा(10.12%) किंचित चांगले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणांची वास्तविक संख्या आणि आर्थिक नुकसान खूप जास्त असू शकते. अनेक पीडित नागरिक हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे सोडून थेट स्थानिक पोलिस किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करतात. यामुळे हेल्पलाइनच्या डेटामध्ये अशा तक्रारींचा समावेश होत नाही.
विशेष म्हणजे सायबर गुन्हेगार (cyber criminals) अनेकदा इतर राज्यांतून किंवा भारताबाहेरून काम करतात. फसवणुकीची तक्रार करण्यात पीडितांना होणारा विलंब आणि डेटा मिळविण्यातील आव्हाने देखील रक्कम परत मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करतात.
मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन टीमने 2024 मध्ये 150 कोटीं रुपयांहून अधिक रक्कम परत मिळवली. त्यांनी 6,500 संशयास्पद मोबाईल उपकरणांना काळ्या यादीत टाकले आहे.
RTI द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, टास्क जॉब फ्रॉडमुळे होणारे आर्थिक नुकसान जून 2024 पर्यंत 36.89 कोटींवर पोहोचले होते. या तुलनेत, 2023 च्या संपूर्ण वर्षाचा आकडा हा 40.77 कोटी रुपये होता.
गुंतवणूकीतील आणि ट्रेडिंग फसवणुकीमुळे होणारे नुकसान लक्षणीयरित्या वाढले आहे. या घोटाळ्यांमुळे 2023 मध्ये 7.76 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु जून 2024 पर्यंत जवळपास हा आकडा 25 पटीने वाढून 191 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
हेही वाचा