गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा- अतुल कुलकर्णी

बालभारतीच्या दुसरी इयत्तेच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती कमी व्हावी, यासाठी आले आहेत. गणिताच्या पुस्तकात २१ ते ९९ या संख्यांचं वाचन व शब्दात लेखन यात बदल केला आहे. त्यानुसार, सत्त्यान्नवऐवजी नव्वद सात असं शिकवावं, असं सुचवण्यात आलं आहे. त्यामुळं शासनानं हा बदल थांबवावा, यासाठी निवेदन देण्याची भूमिकाही अनेकांनी जाहीर केली आहे. मात्र, प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी बालभारती पुस्तकातील या बदलाचं स्वागत केलं आहे.

बदलाचे स्वागत

अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी गणिताच्या पुस्तकातील या बदलाचे स्वागत करत, बदल स्विकारायला हवा असं म्हटलं. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन निलेश निमकर या शिक्षणतज्ञाचा लेख शेअर करत अतुल यांनी, ‘जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल’, असं म्हटलं आहे.

भाषेची तोडफोड

मराठीचे इंग्रजीकरण, मराठी अप्रिय करण्याचा घाट घालत करण्यात आलेला हा बदल मराठी भाषेची तोडफोड करणारा आहे, अशी तक्रार साहित्य वर्तुळातून केली जात आहे. त्याचप्रमाणं शासनानं हा बदल थांबवावा, यासाठी निवेदन देण्याची भूमिका देखील अनेकांनी जाहीर केली आहे. मात्र, भाषेची कोणत्याही प्रकारे तोडफोड होणार नसून, टीका करण्यापेक्षा बदल समजून घ्यावेत, असं आवाहन गणितज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा गैरसमज- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या