Advertisement

अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा गैरसमज- मुख्यमंत्री

अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर अर्थसंकल्प फुटला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

अर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा गैरसमज- मुख्यमंत्री
SHARES

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पाचे मुद्दे ग्राफीक्ससह प्रसिद्‌ध होत असल्याने विरोधकांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर अर्थसंकल्प फुटला नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

नेमकं काय झालं? 

मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे ग्राफिक्ससह टाकले जात होते. हा प्रकार धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनतर, विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी  हा सभागृहाचा अपमान असून सरकारने सभागृहाची त्वरीत माफी मागावी, अशी मागणी केली.

वेगवान अपडेट्स

त्यावर खुलासा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्प फुटलेला नाही. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही अर्थसंकल्पाचे ताजे अपडेट्स देत होतो. अर्थमंत्र्यांचं भाषण आणि या पोस्टमध्ये २ ते ३ मिनिटांचं अंतर राखण्यात आलं. एकही पोस्ट आधी शेअर करण्यात आली नाही.  यावरून विरोधकांचा गैरसमज झाला आहे. 

विरोधकांनी सभागृहात येऊन अर्थसंकल्प जाणून घ्यावा. तसंच आमच्याप्रमाणे विरोधकांनीही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.



हेही वाचा-

Live Update: शेतकऱ्यांना ४४६१ कोटी रुपये अनुदान- सुधीर मुनगंटीवार

विखे, क्षीरसागर, महातेकर यांच्या मंत्रिपदाला उच्च न्यायालयात आव्हान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा