हृदयरोपण शस्त्रक्रिया झालेल्या स्विडनने मिळवले 63.38 टक्के

आतापर्यंत मुंबई शहरात 50 हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अशीच एक हृदयरोपण शस्त्रक्रिया झालेली स्विडन डिसूझा हिला बारावीच्या परीक्षेत 63.38 टक्के गुण मिळाले आहेत. 2016 मध्ये तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 8 महिने ती शाळेत किंवा कुठेच फिरू शकत नव्हती. स्विडनला डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला होता. पण त्यानंतर तिच्यावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिला नवीन जीवदान मिळाले.

हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तिच्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती जवळपास आठ महिने शाळेत जाऊ शकली नव्हती. पण तिने घरी ही तेवढाच अभ्यास केला आणि आता तिने हे यश मिळवले आहे. तिने आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

अॅन्थोनी डिसूझा, स्विडनचे वडील

स्विडनचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. स्विडनला आता तिच्या पुढच्या करिअर मध्ये बीएमएस करायचे आहे. विक्रोळीत राहण्याऱ्या स्विडनने घेतलेल्या कष्टामुळे आता ती बारावीच्या परीक्षेत फर्स्ट क्लास पास झालीय.

मला बीएमएस करून माझ्या कुटुंबाला आर्थिक मदत करायची आहे. आता मी कम्प्यूटर क्लास जाईन केला आहे. माझ्यावर कसल्याही प्रकारची निर्बंध नाहीत. मी एक सामान्य आयुष्य जगत आहे.

स्विडन डिसूझा, विद्यार्थीनी

हेही वाचा -

बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

पुढील बातमी
इतर बातम्या