बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी


  • बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी
SHARE

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारल्याचे पहायला मिळाले.

यावर्षी राज्याचा निकाल 89.50 इतका लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्क्यात 2.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षीही कोकण बोर्डनेच बाजी मारल्याचे पहायला मिळत आहे. तर मुंबई बोर्ड शेवटच्या स्थानावर आहे.

9 जून रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळेल असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले आहे. कोकण विभागाचा निकाल 95.20 टक्के तर मुंबई विभागाचा निकाल 88.21 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 93.5 टक्के तर मुलांचा निकाल 86.65 टक्के इतका लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.1 टक्के लागला आहे.

या लिंक वर बघा निकाल - 
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com
www.rediff.com/exams
http://jagranjosh.com/results
http://htcampus.com/results

मोबाईलवरूनही तुम्ही तुमचा निकाल बघू शकता -
तुम्ही आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, बीएसएनएलधारक असाल तर 58888111 या नंबरवर MAH12 ( स्पेस) द्या आणि तुमचा नंबर टाका.

सिद्धेश शेरकर या पोद्दार कॉलेजच्या विद्यार्थ्याला 12 वी वाणिज्य शाखेत 94.92 टक्के गुण मिळाले आहेत.

मी माझ्या यशाचे श्रेय आई-बाबांना देतो. रोज 4 ते 5 तास मी अभ्यास करायचो. माझ्या मेहनतीचे फळ मला मिळले. प्रयत्न करत राहिल्यावर यश  मिळते हे आज मला पटले. मला खूप आनंद झाला आहे. माझा आनंद व्यक्त शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी आता सीए करणार आहे. सध्या मी सीपीटी चा अभ्यास करतोय. 

सिद्धेश शेरकर, विद्यार्थी


मला 94.92 टक्के गुण मिळालेत.  एवढे टक्के कधी मिळतील असे वाटलेच नव्हते. मी वर्षभर खूप मेहनत घेतली. माझ्या यशाचे श्रेय मी आई-वडील आणि माझ्या शिक्षकांना देते. मला पुढे जाऊन CA होण्याची इच्छा आहे.

वेदीक ठेकेकर, विद्यार्थिनी, वाणिज्य शाखा 


संबंधित विषय
ताज्या बातम्या