शैक्षणिक मंडळ आणि काही राज्य सरकारांच्या मागणीनंतर अखेर काही अटी शर्थींवर केंद्रीय गृह मंत्रालयाने १०वी आणि १२वी च्या (Ssc and hsc exams) परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (home minister amit shah) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून यासंबंधीची माहिती दिली आहे. तर गृह विभागाकडून याविषयीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे (lockdown) शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, आयसीएसई इ. मंडळांना १०वी आणि १२वी च्या परीक्षा देखील रद्द कराव्या लागल्या.
हेही वाचा - सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांच्या तारखा जाहीर
परंतु सीबीएसई बोर्ड आणि अनेक राज्यांनी १० वी, १२ वी परीक्षा घेऊ देण्याची विनंती गृह विभागाकडे केली होती. यावर सारासार विचार करून आणि मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य शैक्षणिक मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांना लाॅकडाऊनच्या नियमांचं पालन करत १० वी, १२ वी च्या परीक्षा घेण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात येत आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी तसं पत्र राज्यांच्या सचिवांना पाठवल्याची माहिती देखील अमित शाह यांनी दिली.
कुठल्या अटी ?
हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, ग्रेड पद्धतीनं विद्यार्थ्यांना पदवी द्या- उदय सामंत