Advertisement

सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांच्या तारखा जाहीर


सीबीएसई १०वी, १२वी परीक्षांच्या तारखा जाहीर
SHARES
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) १०वी आणि १२वीच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षांची तारीख घोषित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा १ जुलै ते १५ जुलैदरम्यान पार पडणार आहेत. 

सीबीएसई बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा कधी होणार याची सर्वच वाट पाहत होते. परंतु, आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १ जुलै २०२० ते १५ जुलै २०२० या कालावधीत परीक्षा होतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा', असं परीक्षेच्या तारखेसंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्री रमेश निशांक यांनी म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळं सीबीएसईच्या राहिलेल्या विषयांच्या परीक्षा स्थगित कराव्या लागल्या होत्या. यावेळी सीबीएसईने, परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर परीक्षांच्या तारखा घोषित करण्यात येतील, असेही सांगितले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा