सर्व शाळा इंटरनेट-वायफायने जोडणार - शिक्षणमंत्री

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातंर्गत शिक्षण विभागातर्फे दिक्षा या अॅपच नुकतचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आलं अाहे.  येत्या काही महिन्यात राज्यातील सर्व शाळांना इंटरनेट आणि वायफायने जोडणार असल्याची घोषणा विनोद तावडे  यांनी केली आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये सर्व शाळा महाविद्यालयांना मोफत इंटरनेट सुविधा देण्याबाबत शिक्षक भारती संघटनेनं यासंदर्भात पत्र लिहलं होतं.

सध्या काही शाळांना मिळणारं वेतन अनुदान मिळणं बंद असल्यानं शाळा व्यवस्थापनाला अनेक अडचणींना सामोर जावं लागत आहे. त्यातच शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या योजनेमुळं इंटरनेटच्या खर्चाचा भारही त्यांच्यावर पडणार आहे.

ही सुविधा उपयुक्त ठरणार

सध्या सर्व शाळांमध्ये विविध कामांसाठी इंटरनेटची गरज भासते. तसंच सध्या सुरू असलेल्या संचमान्यता, विद्यार्थी माहिती, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत चालणाऱ्या विविध वेबसाईट, अॅप्स, डिजीटल क्लासरुम, ई-लर्निंगचा वापर, यांसारख्या एक ना अनेक कामांसाठी शाळेला इंटरनेटची गरज वारंवार भासत असते. त्यामुळं ही नवीन योजनासध्या सर्व शाळांमध्ये विविध कामांसाठी इंटरनेटची गरज भासते. तसंच सध्या सुरू असलेल्या संचमान्यता, विद्यार्थी माहिती, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत चालणाऱ्या विविध वेबसाईट, अॅप्स, डिजीटल क्लासरुम, ई-लर्निंगचा वापर, यांसारख्या एक ना अनेक कामांसाठी शाळेला इंटरनेटची गरज वारंवार भासत असते. त्यामुळं ही नवीन योजना सर्व शाळांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्व शाळांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

अँड्रॉईड फोनचं प्रशिक्षण

तसंच टेक्नोसॅव्ही टिचर्स संकल्पनेद्वारे प्रत्येक शिक्षकाला अँड्रॉईड फोनचा दैनंदिन वापर करण्यासाठी सध्या प्रशिक्षण दिलं जात अाहे. तसंच विविध स्पर्धा परीक्षा, विविध शासकीय शिष्यवृत्या आणि शासकीय योजनांची माहिती ऑनलाईन मागवली जात आहे, अशी माहिती शिक्षक भारतीने पत्रात दिली होती.


हेही वाचा - 

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

यंदाही प्रवेशाचा गोंधळ होणार?


पुढील बातमी
इतर बातम्या