शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे 'या' ५ विद्यापीठातील परीक्षा पुढे ढकलल्या

सध्या विद्यापीठांमध्ये २०१९-२०२० मधील अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू आहेत. पण अशा परिस्थितीत देखील पाच विद्यापीठातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सपांचा हत्यार उपसलं आहे. याचा सरळ परिणाम विद्यापीठ घेत असलेल्या परीक्षांवर झाला आहे.     

अहवालानुसार अमरावती, नांदेड, औरंगाबाद, जळगाव आणि नागपूरमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण, याचा मुंबईत होणाऱ्या परीक्षांवर कुठलाच परिणाम झाला नाही. शहरातील बहुतेक कामं शिक्षक आणि ऑनलाईन सेवा पुरवठादार करीत आहेत. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर कमी अवलंबून राहावं लागत आहे. तरीही, संप सुरू राहिल्यास निकालास उशीर होऊ शकतो.

जुलै महिन्यात, यूजीसीनं परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरच्या संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. ज्यानं देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना सप्टेंबर २०२० अखेर अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. ६ जुलै रोजी, यूजीसीनं सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचं समर्थन केलं.

तथापि, आतापर्यंत, यूजीसीनं परीक्षा आयोजित करण्यासाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी महिन्याची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपण या प्रकरणात लक्ष घालून आगामी काळात तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे. शिवाय त्यांनी संघटनेला संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.


आवश्यक असल्यास अंतिम वर्षांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊ : मुंबई विद्यापीठ

एकाच वेळी २ परीक्षा असल्यानं 'या' परीक्षांच्या वेळापत्रकात बदल

पुढील बातमी
इतर बातम्या