Advertisement

एकाच वेळी २ परीक्षा असल्यानं 'या' परीक्षांच्या वेळापत्रकात बदल


एकाच वेळी २ परीक्षा असल्यानं 'या' परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
SHARES

विद्यापीठाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा एकत्र एकाच वेळी असल्याचं लक्षात घेता कक्षाने वेळापत्रकात बदल केला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक २१ सप्टेंबरला जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतर विद्यापीठांच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षा एकत्र येत असल्याचे समोर आले.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानं विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एकाच वेळी २ परीक्षा असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांनी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याची विनंती कक्षाला केली होती. विशेषत: पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी होती.

नवे वेळापत्रक 

  • शिक्षणशास्त्र एकात्मिक अभ्यासक्रम पदवी (बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड) – १८ ऑक्टोबर (११ ऑक्टोबर)
  • शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर (एमपीएड) – २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर (३ ते ७ ऑक्टोबर)
  • शिक्षणशास्त्र पदव्युत्तर (एम.एड) – ५ नोव्हेंबर (३ ऑक्टोबर)
  • शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी (बी.पी.एड) – ४ ते ८ नोव्हेंबर (११ ते १६ ऑक्टोबर)
  • शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड) -२१ ते २३ ऑक्टोबर
  • ५ वर्षे विधि अभ्यासक्रम -११ ऑक्टोबर
  • तीन वर्षे विधि अभ्यासक्रम (एलएलबी) – २ व ३ नोव्हेंबर
  • वास्तुकला पदव्युत्तर (एम.आर्च) – २७ ऑक्टोबर
  • हॉटेल मॅनेजमेंट पदवी (बी.एचएमसीटी) – १० ऑक्टोबर
  • हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर (एम.एचएमसीटी) – २७ ऑक्टोबर
  • एमसीए  – २८ ऑक्टोबर
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा