अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

File Image
File Image

अकरावी प्रवेश विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. ५९,३२२ विद्यार्थ्यांना या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले असून ३१ डिसेंबरपर्यत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. यामध्ये कला शाखेतील ४४८७ विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेतील ३५,३४२ विद्यार्थ्यांना व विज्ञान शाखेतील १८,८१९ विद्यार्थ्यांना या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे.

राज्य सरकारने २३ डिसेंबरला एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एडब्ल्यूएस वर्गातून प्रवेश घेण्याची सवलत देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जात बदल करून सवलत घेता यावी, यासाठी ही विशेष फेरी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतले नव्हते. शिवाय, ज्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घ्यायचा आहे, असे एकूण मुंबई विभागातून ६८,१७८ विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते. 

या विशेष फेरीमध्ये मुंबई विभागात ईडब्ल्यूएस कोट्यातून १८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर आतापर्यतच्या सर्व फेऱ्यामध्ये एब्ल्यूएस कोट्यातून ४६१४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहेत. या विशेष फेरीनंतर सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय अजूनही मिळाले नाही त्यांच्यासाठी रिक्त राहणाऱ्या जागेचा तपशील 1 जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर होईल.


हेही वाचा -

कोरोनाबाधितांसाठी आरोग्य व्यवस्था उभारण्याकरिता महापालिकेला आतापर्यंत १,४७० कोटींचा खर्च

'फ्री' काश्मिर प्रकारणात पोलिसांकडून ‘सी’ समरी अहवाल सादर


पुढील बातमी
इतर बातम्या