११ वी प्रवेशासाठी 'लास्ट चान्स'

सप्टेंबरचा दुसरा आठवडा संपत आला, तरी अजूनही बरेच विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित आहेत. ११ सप्टेंबरला दुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. या आधी ४ नियमित प्रवेश फेऱ्या, २ विशेष फेऱ्या, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या त्तत्वावर एक फेरी अशा एकूण ७ फेऱ्या राबवण्यात आल्या. तरीही अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नसल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी ८ व्या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

१० वी पुरवणी परीक्षेच्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. ८ वी फेरीही 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश' या तत्त्वावर घेतली जाणार आहे. या आधीही याच आधारे एक फेरी राबवण्यात आली होती. मात्र ही ८ वी विशेष फेरी अंतिम असणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी कोणतीही फेरी होणार नाही. त्यामुळे या आधी प्रवेश न घेतलेल्या, काही कारणास्तव प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान ही फेरी राबवण्यात येईल.

यावेळी ज्या विद्यार्थ्यांना या आधी घेतलेले प्रवेश रद्द करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शाखा बदलायची आहे, शाखा तीच ठेऊन माध्यम बदलायचे अाहे आणि अद्याप ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी या फेरीत आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

असे आहे या फेरीसाठी वेळापत्रक -

१४ ते १६ सप्टेंबर - ऑनलाईन प्रवेश घेणे

१८ सप्टेंबर - सकाळी ९ वाजता रिक्त जागांची यादी जाहीर होणार

१९ ते २५ सप्टेंबर - ऑनलाईन मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे


हे देखील वाचा -

विद्यार्थ्यांनो, अकरावीचा प्रवेश रद्द करू नका, नाहीतर गोत्यात याल!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

पुढील बातमी
इतर बातम्या