Maharashtra HSC Result 2022: राज्याचा एकूण निकाल 94.22%, सर्वात कमी निकाल मुंबईचा

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra HSC result 2022) अखेर घोषित करण्यात आला आहे. यामध्ये बारावीचा एकूण निकाल 94.22% इतके टक्के लागला आहे.

2020 च्या तुलनेत सुमारे पाच टक्क्यांची वाढ निकालात पाहायला मिळत आहे. एकूण 153 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा राज्याचा 98.30 टक्के इतका निकाल लागला आहे. कला शाखेचा राज्याचा निकाल 90.51 टक्के इतका निकाल लागला आहे. वाणिज्य विभागाचा निकाल 91.71 टक्के इतका लागला आहे.

राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 97.21 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.

यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 95.32 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 93.29 % इतका आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड बारावीची परीक्षा ही संपूर्ण राज्यभरातील एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी दिली होती.


हेही वाचा

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल ‘असा’ चेक करा

पुढील बातमी
इतर बातम्या