Advertisement

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल ‘असा’ चेक करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल आज जाहीर केला आहे.

Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल ‘असा’ चेक करा
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच बारावीचा निकाल बुधवारी ८ जून २०२२ रोजी म्हणजेच आज जाहीर होणार आहे. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासावी.

महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते. परंतु निकाल उद्या ८ जून रोजी जाहीर केले जाणार असल्याचे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी केले गेले आहे.

‘या’ वेबसाईटवर लॉग इन करा

https://msbshse.co.in/

http://hscresult.mkcl.org/

https://mahresult.nic.in/

https://www.mahahsscboard.in

http://results.nic.in/

‘असा’ तपासा निकाल

  • महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.
  • होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

दरम्यान, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.

दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

‘या’ विद्यार्थ्यांची मेडीकल, इंजिनिअरींगची फी मुंबई पालिका भरणार

पालिका शाळा विद्यार्थ्यांना नवा गणवेश, निळ्याऐवजी ‘या’ रंगाचा पोषाख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा