All the best! आज लागणार बारावीचा निकाल

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी (HSC) च्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.  

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेण्यात आली आली होती. या परीक्षेला बोर्डाच्या ९ विभागातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी बसले होते. नव्या अभ्यासक्रमानुसार झालेली ही पहिलीच परीक्षा असल्याने यंदाचा निकाल अधिक टक्क्यांनी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल लवकर यावर्षी लवकर लागला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागेल याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा (SSC) चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 

'इथं' बघा HSC चा निकाल:

maharashtraeducation.com

mahresult.nic.in

and mahahsscboard.maharashtra.gov.in.

'असा' बघा निकाल:

  • वरीलपैकी कुठल्याही एका वेबसाईटवर जा
  • निकालाच्या लिंकवर क्लिक करा
  • तुमचा सीट नंबर टाका
  • निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल


हेही वाचा-

१५ दिवस आधीच जाहीर झाला बी. काॅम. चा निकाल


पुढील बातमी
इतर बातम्या