Advertisement

१५ दिवस आधीच जाहीर झाला बी. काॅम. चा निकाल

यंदा मुंबई विद्यापीठाने १५ दिवस आधीच म्हणजेच ३० दिवसांत बी. काॅम. चा निकाल जाहीर केला आहे. निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

१५ दिवस आधीच जाहीर झाला बी. काॅम. चा निकाल
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या थर्ड इयर  बी.कॉम. परीक्षेचा (सहाव्या सत्रातील) निकाल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आला. उन्हाळी सत्रातील या परीक्षेला एकूण ५० हजार ७०८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ६०.३१ अशी आहे. विशेष म्हणजे परीक्षा झाल्यानंतर केवळ ३० दिवसांत निकाल जाहीर झाला आहे.

३० दिवसांत निकाल

मुंबई विद्यापीठाने ३ एप्रिल ते २५ एप्रिल २०१९ दरम्यान थर्ड इयर बी. काॅम. ची परीक्षा घेतली होती. विद्यापीठाच्या नियमानुसार परीक्षा घेतल्याच्या ४५ दिवसांच्या आत निकाल लागणं अपेक्षित आहे. परंतु यंदा मुंबई विद्यापीठाने १५ दिवस आधीच म्हणजेच ३० दिवसांत निकाल जाहीर केला आहे. निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुलींची बाजी

उत्तीर्ण झालेल्या २३ हजार ६७८ विद्यार्थ्यांपैकी १४,९६९ (६८.७६%) विद्यार्थीनी असून ८, ७०९ (४९.७९%) विद्यार्थी आहे. त्यानुसार थर्ड इयर बी. काॅम. च्या परीक्षेत यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारल्याचं दिसत आहे.    

निकाल राखीव

यंदा थर्ड इयर बी. काॅम.च्या २ लाख २२ हजार ६३८ उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी होत्या. या उत्तरपत्रिका ३ हजार ७०७ शिक्षकांनी तपासल्या. यातील ५७ हजार १०८ उत्तरपत्रिकांचं मॉडरेशन करण्यात आलं. काही विद्यार्थी आधीच्या सत्रातील परीक्षा अनुत्तीर्ण असल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.  

काही विद्यार्थ्यांनी जुन्या श्रेयांक प्रणालीतील  आकृतिबंधात प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण होऊन नवीन नव्या आकृतिबंधात तृतीय वर्षांची परीक्षा दिली आहे, त्यांना समकक्षता देण्याचं काम सुरू आहे. या विद्यार्थ्यांचे निकाल देखील राखीव ठेवण्यात आले आहेत, असं परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलं.



हेही वाचा-

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस

मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा