मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक 'अपमानास्पद' मीम केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक 'अपमानास्पद' मीम केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर मोदींविरोधात अपमानास्पद मीम पोस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर ही पोस्ट भाजप कार्यकर्त्यांनी हटविण्यास सांगितली होती, मात्र ती पोस्ट सोशल मीडियावरून न हटवल्यानं कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

पोस्टवर कार्यकर्त्यांचा आक्षेप

सोशल मीडियावर मोदींविरोधात पोस्ट करण्यात आलेल्या मीमवर मुंबईतल्या सायन-कोळावाडा परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. तसंच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही 'पोस्ट तातडीनं हटवावी आणि माफी मागावी', असं सांगितलं होतं. परंतु, ही पोस्ट सोशल मीडियावरून न काढल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी अॅटाँप हिल पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

योग्य ती कारवाई

भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या या तक्रारी प्रकरणी कायदेशीर मत घेऊन, त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र मोदींविरोधात सोशल मीडियावर शेअर केलेलं मीम हटवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

'परे'वर लवकरच सुरू होणार तिसरी एसी लोकलसंबंधित विषय
ताज्या बातम्या