डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस

महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा वाद आणखीनच चिघळत चालला आहे. डाॅ. पायलच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी ३ डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र तक्रार दाखल झाल्यापासून या ३ डॉक्टर महिला फरार झाल्या आहेत.

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: ३ फरार डॉक्टरांना डीनची नोटीस
SHARES

महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा वाद आणखीनच चिघळत चालला आहे. डाॅ. पायलच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी ३ डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र तक्रार दाखल झाल्यापासून या ३ डॉक्टर महिला फरार झाल्या आहेत. त्यामुळं तात्काळ हजर व्हा, नाहीतर गोत्यात याल’ अशी नोटीस रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी डॉक्टरांच्या रुमवर लावली आहे. या प्रकरणी येत्या मंगळवारी भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने नायर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.


पंख्याला गळफास

मूळ जळगावची रहिवासी असलेली डॉ. पायल ही टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होती. गेल्या, अनेक दिवसांपासून पायलचे  काही सहकारी तिची जातीवाचक चेष्टा करत होते. दररोज होणाऱ्या या त्रासामुळं पायलनं मानसिक तणावाखाली येऊन गुरूवारी संध्याकाळी हाॅस्टेलमधील खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.


अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा 

पायलनं आत्महत्या केल्याचं समजताच घटनास्थळी पोलिसांना धाव घेतली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ३ डॉक्टरांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या ३ महिला डॉक्टर फरार झाल्या असून पोलीस आणि रुग्णालय प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत. या ३ डॉक्टरांच्या रूमवर नोटीस चिकटवण्यात आली आहे. त्याशिवाय रॅगिंगच्या चौकशीकरिता पोलिसांनी पथक देखील तयार केले आहे. तसंच, नातेवाईकांनी काही व्हॉट्सअॅपचे स्क्रिन शॉट पोलिसांना तपासाकरीता दिले आहेत. त्याशिवाय, डॉ. पायलच्या आईनं जळगाव येथील पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचं समजत आहे.


त्रीसदसीय समिती

डॉ. पायलच्या आत्महत्येनंतर ३ सदसीय समिती तयार करण्यात आली आहे. या प्रकरणी ३ सदसीय समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी या ३ महिला डॉक्टर अद्याप आल्या नाही. यासंदर्भातील अहवाल २ दिवसांत समितीकडं पाठवण्यात येणार आहे.हेही वाचा -

चीनच्या कंपनीने बनवलं पहिलंवहिलं सुपर ५ जी सिम

यंदा पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्जसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा