चीनच्या कंपनीने बनवलं पहिलंवहिलं सुपर ५ जी सिम

चीनमधील एका खाजगी कंपनीने जगातलं पहिलंवहिलं सुपर ५ जी सिम तयार केलं आहे. हे सिम कार्ड लवकरच बाजारात येण्याची शक्यता असल्याने ४ जी एलटीई सिम कार्ड (4G LTE SIM)चा जमाना इतिहासजमा होईल.

SHARE

चीनमधील एका खाजगी कंपनीने जगातलं पहिलंवहिलं सुपर ५ जी सिम तयार केल्याची घोषणा केली आहे. हे सिम कार्ड लवकरच बाजारात येण्याची शक्यता असल्याने ४ जी एलटीई सिम कार्ड (4G LTE SIM)चा जमाना इतिहासजमा होईल. गिझबोट या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, चायना युनिकाॅम (China Unicom) या कंपनीने झिगुआंग ग्रुप ( Ziguang Group)सोबत मिळून या ५ जी सुपर सिम कार्डची निर्मिती केली आहे. सध्याच्या ४ जी एलटीई सिम कार्डची स्टोरेज क्षमता केवळ १२८/२५६ केबी इतकीच आहे, परंतु या सुपर ५ जी सिम कार्डची क्षमता १ टीबीपर्यंत असेल.  

सुरक्षित डेटा

कमी क्षमतेमुळे ४ जी कार्डमध्ये फक्त काही मॅसेज तसंच काॅन्टॅक्ट साठवता येतात. तर सुपर ५ जी कार्ड ३२ जीबी, ६४ जीबी, १२८ जीबी ते १ टीबी स्टोरेज क्षमतेचं असेल. या कार्डमध्ये इनस्क्रिप्टेड (Encrypted storage system) स्टोरेज यंत्रणा असल्याने या कार्डमधील बँकअप व्हिडिओ, म्युझिक इ. अतिरिक्त डेटा सुरक्षीत ठेवता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. खासकरून एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये डेटा मुव्ह करताना. चीनमध्ये आॅक्टोबर २०१९ पर्यंत ५ जी नेटवर्क उभारण्याचं काम करण्यात येणार असून वर्षअखेरपर्यंत ५ जी सिम कार्ड बाजारात येईल, असं म्हटलं जात आहे. 

 लवकरच भारतात

हे  ५ जी सुपर सिम कार्ड केवळ ५ जी नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनमध्येच चालेल. या सुपर ५ जी सिम कार्डचा वापर चीनमध्ये यशस्वी झाल्यास हे सिम कार्ड लवकरच भारतातही येऊ शकेल, असं म्हटलं जात आहे.  हेही वाचा-

मोदींविरोधात अपमानास्पद मीम, भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांत तक्रारसंबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ