शिक्षक पात्रता परीक्षा १५ जुलैला

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या ८ जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मार्फत घेण्यात येणारी नेट परीक्षा ८ जुलै रोजी असल्यानं परीक्षार्थींचं नुकसान होऊ नये यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला अाहे. आता शिक्षक पात्रता परीक्षा येत्या १५ जुलै रोजी होणार आहे.

उत्तीर्ण होणं अनिवार्य

 राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदासाठी इच्छुक उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असते. या परीक्षेच्या प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याची मुदत १५ जुलैपर्यंत अाहे.  याबाबतची माहिती https://mahatet.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात अाली अाहे.


हेही वाचा -

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'

सर्व शाळा इंटरनेट-वायफायने जोडणार - शिक्षणमंत्री


 

पुढील बातमी
इतर बातम्या