गणिताचे शिक्षक घेणार प्रशिक्षण

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

 गणित विषयाच्या शिक्षणाचा दर्जात्मक पद्धतीनं विकास व्हावा या उद्देशानं मुंबई आयआयटी व राज्य सरकारतर्फे 'क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथ्स एज्युकेशन' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. २०१५ साली सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत गणित विषयाच्या शिक्षकांना दर्जात्मक पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांची निवड प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येते.

१४ जुलैला परीक्षा

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षातही हा उपक्रम राबवण्यात येणार असून अाहे. १४ जुलैला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत यासाठीची प्रवेश परीक्षा पार पडणार आहे.   या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जुलै अाहे.  इच्छुक शिक्षकांनी https://goo.gl/forms/pVgrUtJXIKgmniwx1 या वेबसाइटवर अर्ज करायचा अाहे. 

मास्टर ट्रेनरची संख्या वाढणार

आतापर्यंत या उपक्रमातर्गत २७३ गणित शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित करण्यात आलं असून १२ हजार ५०० शिक्षकांना थेट प्रशिक्षण देण्यात आलं आहे. सध्या मास्टर ट्रेनरची संख्या कमी असल्यानं ती वाढविण्याच्या दृष्टीनं ३०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासाठी ही परीक्षा घेतली जाणार अाहे.


हेही वाचा -

यूजीसी गाशा गुंडाळून नवीन आयोग येणार

स्कूल बससाठी विशेष सुरक्षा मोहीम


 

पुढील बातमी
इतर बातम्या