अखेर मेडिकलच्या अॅडमिशनला सुरुवात, फीवाढीचा तिढा लवकरच सुटणार!

  • मुंबई लाइव्ह टीम & नम्रता पाटील
  • शिक्षण

मुंबईसह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वैद्यकीय कॉलेज पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा लवकरच सुटणार असून या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी बुधवारी २५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारणी करण्यात येत होती. दरम्यान, खासगी वैद्यकीय कॉलेज प्रशासनाला व्यवस्थापन कोटा व अनिवासी भारतीय कोट्यासाठी फीवाढीला परवानगी देऊन हा प्रवेश प्रक्रियेचा तिढा सोडवण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय कॉलेज पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिली फेरी राबवण्यात आली होती. या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी ची आकारणा खासगी कॉलेज करत होते. विद्यार्थ्यांची ही लूट थांबवण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या फी नियंत्रण समितीकडून 'सर्व कोट्याच्या विद्यार्थ्यांना एकसमान फी आकारावी' अशी सूचना करण्यात आली होती. दरम्यान, या सूचनेकडे कानाडोळा करत खासगी विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतील प्रवेश नाकारले होते. त्यामुळे प्रवेश न मिळालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाकडे (डीएमईआर)कडे धाव घेतली होती.

नोटीसमुळेच खासगी कॉलेजांचे एक पाऊल मागे

पहिल्या फेरीत जवळपास दोनशेपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे या सर्व घटनेची गंभीरपणे दखल घेत प्रवेश न देणाऱ्या कॉलेजांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान या नोटीसमुळेच खासगी कॉलेजांनी एक पाऊल मागे घेत प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे.


हेही वाचा

महापालिकेच्या रुग्णालयांतही मिळणार दंत उपचार?

पुढील बातमी
इतर बातम्या