Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयांतही मिळणार दंत उपचार?


महापालिकेच्या रुग्णालयांतही मिळणार दंत उपचार?
SHARES

सध्या दातांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे दंत रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन महागडे वैदयकीय उपचार घ्यावं लागतं. मात्र, ही महागडी दंत चिकित्सा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं असल्याने महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुसज्ज दंत चिकित्सालय निर्माण करण्याची मागणी होत आहे.


म्हणून केली ही मागणी

मुंबईतील गोरगरीब जनतेला महापालिका रुग्णालयांत अल्प आणि मोफत दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिला जातो. परंतु, महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालय आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये दंत चिकित्सालय असली तरी तेथे दातांच्या सर्व समस्यांवर उपचार उपलब्ध नसते. दातांमध्ये चांदी किंवा सिमेंट भरणे एवढेच उपचार या चिकित्सालयात केले जातात. परिणामी दातांचे इतर इलाज जसे रुट कॅनल, कवळी बसवणे, कृत्रिम दात बसवणे इत्यादी सर्व समस्यांवर उपचार घेण्यासाठी उपनगरातील रुग्णांना नायर दंत रुग्णालयात यावं लागतं.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेची मागणी

नायर रुग्णालयांमध्ये जाणे हे सर्वांना शक्य नसल्याने उपनगरीय रुग्णालयांमध्ये दातांच्या सर्व समस्यांवर उपचार मिळायला हवा यासाठी महापालिकेच्या दंत महाविद्यालयातून शिकून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना आळीपाळीने उपनगरांतील दंत चिकित्सालयामध्ये पाठवून त्यांच्याकडून रुग्णांना उपचार देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. यासाठी लागणारी साधनसामग्रीही महापालिकेने खरेदी करून ती उपलब्ध करून दिली जावी, अशीही सूचना खान यांनी केली आहे.


शुल्कात १० टक्क्यांनी वाढ


नायर दंत रुग्णालयातील शुल्कात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे दंत उपचारावरील शुल्कात १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे तब्बल ८२ वर्षांपासून उत्तम दंत उपचार नागरिकांना देत आहे. या रुग्णालयात एकूण १४७ प्रकारचे उपचार केले जातात. त्यासर्वांच्या शुल्कात दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीपुढे मंजुरीला ठेवण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा