MHT CET 2021 : पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा, पुन्हा होणार परीक्षा

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांत पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यानं विद्यार्थी एमएचटी CET परीक्षे (MHT-CET exam) साठी पोहोचू शकले नाहीत. राज्य सरकारनं MHT CET विद्यार्थ्यांसंदर्भात (Maharashtra Government) यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटलं,राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नसून संबंधित विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.

सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या जोरदार पावसानं जटवाडा रोडवरील बंधारा फुटला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे जटवडा इथळ्या एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये एमएचटीसीईटी २०२१ ची परीक्षा देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत.

पावसामुळे नांदेडमध्ये काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल इथं एमएचटी-सीईटीचे परीक्षा सेंटर होते. दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती.

बी फार्मसी आणि डी फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती. मात्र काल पावसामुळे सकाळी ९ ते १२ या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. परीक्षा केंद्रावर जाण्याऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सेंटरमध्ये पोहोचता आलेले नाही.


हेही वाचा

महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर, 'या' दिवशी होणार परीक्षा

राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार, 'ही' आहे नियमावली

पुढील बातमी
इतर बातम्या