MPSC New Syllabus : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीला यश आले आहे. राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.

मागील अनेक वर्षांपासून पुण्यात किंवा राज्यभर विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन वर्ष कोरोना (Corona) असल्याने या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. त्यानंतर परीक्षांच्या तारखा देखील लवकर जाहीर झाल्या नाहीत. या सगळ्यांमुळे विद्यार्थी संतापले होते. त्यानंतर नवा पॅटर्न लागू करणार असल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.

सोमवारपासून (20 फेब्रुवारी) पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होते. गेल्या दोन महिन्यातील हे तिसरे आंदोलन होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी, 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा आंदोलनस्थळी जात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. आंदोलन स्थळावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असं सांगत त्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होते.


हेही वाचा

दहावी-बारावी परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार, वाचा नवे वेळापत्रक

IIT Bombay : विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा

पुढील बातमी
इतर बातम्या