Advertisement

दहावी-बारावी परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार, वाचा नवे वेळापत्रक

दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या वेळेत पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

दहावी-बारावी परीक्षेसाठी 10 मिनिटे अधिक मिळणार, वाचा नवे वेळापत्रक
SHARES

दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. १० मिनिटे वाढवून देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. (SSC and HSC student) 

कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे (10 min) आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती. आता ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत

या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता, निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.

सकाळच्या सत्रातील दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या वेळेत पुढील प्रमाणे बदल

> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2

< परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 2:10 वाजेपर्यंत

> परीक्षेची सध्याची वेळ सकाळी- 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत

< परीक्षेची सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:10 वाजेपर्यत

> परीक्षेची सध्याची वेळ -सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत

< सुधारित वेळ सकाळी 11 ते दुपारी 1:40 वाजेपर्यंत

दुपारच्या सत्रामध्ये सुधारित वेळापत्रक

> परीक्षेची सध्याची वेळ -दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत

< सुधारित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी 6:10 वाजेपर्यंत

> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत

< सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत

> परीक्षेची सध्याची वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत

< सुधारित वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5:40 वाजेपर्यंत



हेही वाचा

IIT Bombay : विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण, विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा