MPSC ची कमाल संधीची मर्यादा रद्द, वयोमर्यादेनुसार किती वेळाही द्या परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कमाल संधीची मर्यादा एमपीएससीकडून रद्द करण्यात आली असून परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं आहे.  

MPSCमार्फत विविध शासकीय पदांच्या भरती परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्तीसाठीची शिफारस एमपीएससीकडून शासनाला केली जाते. एमपीएससीने निश्चित केलेल्या वयोमर्यादेत उमेदवाराला कितीही वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होती. पण आता यात बदल करण्यात आला आहे.

निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून एमपीएससीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर खुल्या गटातील (open) उमेदवारांना कमाल सहा संधी, उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल नऊ संधी 2020 मध्ये निश्चित केल्या, तर अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले होते.

पण आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) पदभरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या कमाल संधींबाबत फेरबदल केला आहे.


हेही वाचा

10वीचा निकाल लवकरच, त्याआधी 'या' कागदपत्रांसह 11वीच्या प्रवेशाची तयारी करा

बारावीचे विद्यार्थी पेपर रिचेकिंगसाठी 'या' तारखेपासून अर्ज करू शकतात

पुढील बातमी
इतर बातम्या