Advertisement

बारावीचे विद्यार्थी पेपर रिचेकिंगसाठी 'या' तारखेपासून अर्ज करू शकतात

​​मिळालेल्या गुणांबाबत जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमचे पेपर पुन्हा तपासणीसाठी म्हणजेच रिचेकिंगसाठी टाकू शकता.

बारावीचे विद्यार्थी पेपर रिचेकिंगसाठी 'या' तारखेपासून अर्ज करू शकतात
SHARES

बारावीच्या विद्यार्थ्यांना (HSC Result 2022) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत शिवाय पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. हे अर्जही ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकणार आहेत.

मिळालेल्या गुणांबाबत जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही तुमचे पेपर पुन्हा तपासणीसाठी म्हणजेच रिचेकिंगसाठी टाकू शकता. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून मध्ये तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतिसाठी (फोटोकॉपीज) 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. रिचेकिंगसाठी अर्ज करताना अर्ज करायची पद्धतही ऑनलाईन आहे आणि त्यासाठी जी फी भरायची आहे तीसुद्धा ऑनलाईन भरायची आहे.

10 जूनपासून हे अर्ज बारावीच्या विद्यार्थ्यांना करता येऊ शकतील. त्यासाठी http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज (Online Result) विद्यार्थ्यांना करता येऊ शकेल.

ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेल्या गुणांबाबत शंका असेल, ते पुन्हा पेपर रिचेकींगसाठी अर्ज करु शकतात. गुणपडताळणीसाठी 10 ते 20 जून, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्यासोबत या अर्जासाठीचं शुल्कही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना भरता येऊ शकेल.

१) पेपर रिचेकींगसाठी 10 जूनपासून ते 20 जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत

२) उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 10 ते 29 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत

३) अर्ज करण्यासाठीचं शुल्कही ऑनलाईन भरता येणार

४) नापास विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार

५) पुरवणी परीक्षेसाठी 10 जूनपासूनच अर्जाची प्रक्रिया सुरु होणार

६) अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना http:verification.mh-hsc.ac.in या लिंकवर जावं लागेल.

  • जर छायाप्रत हवी असेल तर प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये शुल्क
  • पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपये प्रति विषय इतके शुल्क
  • गुणपडताळणीसाठी प्रति विषय ५० रुपये शुल्क

आधी छायाप्रत घेणं महत्त्वाचं

उत्तर पत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं आवश्यक असतं. छायापत्र मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत मुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात.



हेही वाचा

Maharashtra HSC Result 2022: राज्याचा एकूण निकाल 94.22%, सर्वात कमी निकाल मुंबईचा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा