टीवायबीकाॅम परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

टीवायबीकॉम आणि चार्टड अकाऊंटन्सी (सीए)चे काही पेपर एकाच दिवशी येत असल्यामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थी चिंतेत

मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉमची परीक्षा २ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्याच दरम्यान सीएच्या परीक्षेचे वेळापत्रक आखण्यात आल्याने हजारो विद्यार्थी चिंतेत होते. दोन्ही परीक्षांचे एकच वेळापत्रक बघताच विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात बदल करण्याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार तावडे यांनी लवकरात लवकर वेळापत्रकात बदल करण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाला केली.

बदल करण्याच्या सूचना

शिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि प्रभारी परीक्षा संचालक अर्जुन घाटुळे यांना वेळापत्रकात बदल करण्याविषयी सांगितल्याची माहिती ट्विटरवरून दिली.


हेही वाचा-

कुलगुरूपदाच्या शर्यतीत यांचं नाव? वाचा

मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा- डाॅ. मुणगेकर


पुढील बातमी
इतर बातम्या