Advertisement

कुलगुरूपदाच्या शर्यतीत यांचं नाव? वाचा


कुलगुरूपदाच्या शर्यतीत यांचं नाव? वाचा
SHARES

राज्यापाल सी.विद्यासागर राव यांनी डाॅ. संजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टी केल्यानंतर नव्या कुलगुरूचा शोध घेण्यासाठी प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंचा शोध सुरू असतानाच कुलगुरूपदासाठी दोन नावांची चर्चा प्रामुख्याने शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.


विद्यापीठाच्या कारभाराची हवी जाण

तब्बल १६० वर्षांची ऐतिहासीक पार्श्वभूमी असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची विस्कळीत झालेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासोबत विद्यापीठाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची जबाबदारी नव्या कुलगुरूंवर असेल. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कारभारची उत्तम जाण असणाऱ्या मुंबईतील शैक्षणिक तज्ज्ञाचीच या पदी निवड व्हावी अशी सर्वांची अपेक्षा आहे. असं असताना कुलगुरू पदाच्या या शर्यतीत रूईया कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर आणि स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्सचे संचालक डॉ. नीरज हातेकर पुढं असल्याचं म्हटलं जात आहे. 


जाहिरात प्रसिद्ध

निवड समितीकडून याबाबत अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच या दोघांनीही अत्यंत नम्रपणे या शर्यतीत आपणं नसल्याचं सांगितलं असलं, तरी या दोघांच्या नावाची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे, हे मात्र खरं. आता समितीने दिलेल्या कुलगुरूपदाच्या जाहिरातीनंतर या शर्यतीत आणखी कुणाकुणाचा समावेश होणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.  


मी सध्या तरी कुलगुरूपदाच्या शर्यतीत उतरलेलाे नाही. कुलगुरूपदासी मी अद्याप अर्जही भरलेला नाही. जेव्हा मुंबई विद्यापीठाकडून मला या बाबत विचारणा होईल, तेव्हा मी यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवेन. 

- डॉ. नीरज हातेकर, संचालक, स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स 



सध्या कुरूगुरूपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रतिक्रिया देईन.

- डाॅ. सुहास पेडणेकर, प्राचार्य, रूईया काॅलेज

 


हेही वाचा -

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले

मुंबई विद्यापीठात कोट्यवधी रूपयांचा घोटाळा- डाॅ. मुणगेकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा