Advertisement

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले


सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठ घसरले
SHARES

निकालाचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांमुळे मागील काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठ चांगलेच चर्चेत आहे. यामुळेच विद्यापीठाच्या जागतिक मानांकनात मुंबई विद्यापीठाची घसरण झाली आहे. 'क्वाकारेली सायमंड्स (क्यूएस) एशिया विद्यापीठ मानांकन' २०१८ अहवालात मुंबई विद्यापीठ १४५ वरून १८१ स्थानावर घसरलं आहे.

'क्यूएस' ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जागतिक स्तरावरील विद्यापीठांना रँकींग देते. विद्यापीठांमध्ये होणारं संशोधन, विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा तसेच विद्यापीठाची लोकप्रियता किती आहे, यावरून विद्यापीठाला रँकींग देण्यात येतं.


'आयआयटी' मुंबईची आगेकूच

'क्यूएस'च्या जागतिक रँकिंगमध्ये यंदा 'आयआयटी' मुंबईने १७९ वा क्रमांक पटकावला आहे. आशियातील विद्यापीठाच्या मानांकनात 'आयआयटी' मुंबईने ७५.७ गुण मिळवले आहेत. जगभरात सुमारे ११९०० विद्यापीठे आहेत. मागच्या वर्षी ३५ व्या क्रमांकावर असलेल्या पवईतील 'आयआयटी'ने ३४ वा क्रमांक पटकावला आहे.  



हेही वाचा -

हुश्श, अखेर राखीव निकाल जाहीर

आता परीक्षेसाठी पुरवणी बंद


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा