Advertisement

विद्यापीठात नवी टीम, आता तरी निकाल लागणार का?


विद्यापीठात नवी टीम, आता तरी निकाल लागणार का?
SHARES

टीवायचे रखडलेले निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी विद्यापीठ सध्या शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख ऐन निकालात रजेवर गेले असताना विद्यापीठाने नवीन टीम तयार केली आहे. विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यास सुरूवात केली आहे.

कुलगुरुपदाचा कार्यभार डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपवला आणि प्रकुलगुरूपदी धीरेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजय देशमुख यांच्या टीमला अपयश आल्यानंतर त्याची गंभीर दखल आता शासनातर्फे घेण्यात आली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावलेल्या मुंबई विद्यापीठाने आता कुलगुरूंपाठोपाठ परीक्षा नियंत्रकांची निवडही नव्याने केली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अर्जुन घाटुळे यांची निवड करण्यात आली आहे.

या आधी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदाचा कार्यभार दीपक वासवे यांच्याकडे होता. विद्यापीठाच्या रखडेल्या निकालावरून दीपक वासवे यांच्यावर चहूबाजूंनी टीकाही करण्यात येत होती. त्यामुळे दीपक वासवे यांना हटवून त्यांच्या जागी अर्जुम घाटुळे यांची नियुक्ती करण्यात आली.

विद्यापीठातील रिक्तपदं भरली जात आहेत. खरंतर विद्यापीठाला हे उशीरा आलेलं शहाणपण म्हणावं लागेल. विद्यापीठाच्या या नवीन टीमचा फायदा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी होईल अशी अपेक्षा आहे.

विक्रांत दातार, विद्यार्थी, टीवायबीकॉम

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी घेतलेल्या ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे विद्यापीठाच्या निकालाचे बारा वाजले आहेत. ३१ जुलै, ५ ऑगस्ट,१५ ऑगस्ट अशा निकालाच्या तिनही डेडलाईन पाळण्यात विद्यापीठ सपशेल नापास झाले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. ऑनलाईन असेसमेंटचा हा गोंधळ सावरण्यासाठी प्रकुलगुरू पदाची जबाबदारी व्हीजेटीआयचे संचालक डॉ. धीरेन पटेल यांच्यावर सोपवली आहे.

आता विद्यापीठात तयार झालेल्या नव्या टीममुळे तरी निकाल लवकर लागतील का? ऑनलाईन असेसमेंटचा घोळ आता तरी सुटेल का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.



हेही वाचा

निकालांवरून विद्यार्थी संघटना बुचकळ्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा