Advertisement

विद्यापीठाचे निकाल लागता लागेनात!


विद्यापीठाचे निकाल लागता लागेनात!
SHARES

१५ ऑगस्ट ही विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची तिसरी डेडलाईन. मात्र ही डेडलाईनसुद्धा चुकणार यात शंका नाही. अद्याप लाखो उत्तरपत्रिका तपासायच्या शिल्लक आहेत. त्यामुळे १५ ऑगस्टचीही डेडलाईन पाळणं आशक्य आहे असं दिसतंय. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आगोदरच टांगणीला लागलंय. यातच एमएससी, एमकॉम, एमएला प्रवेश घ्यायचा तरी कसा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावतोय.

मी मुंबई विद्यापीठातून आता टीवायबीकॉमची परिक्षा दिली आहे. मला जर्नलिझम (MMCC) करण्यासाठी पुण्याच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. मात्र मुंबई विद्यापीठाच्या गोंधळामुळे मला प्रवेश घेता आलेला नाही. पुण्यातून शिक्षण पूर्ण करणायचे माझे स्वप्न, स्वप्नच राहते की काय असे वाटायला लागले आहे.

प्रज्ञा संकपाळ, विद्यार्थिनी

एमएससीसीला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने १७ ऑगस्टची मुदत दिली आहे. १४ ऑगस्ट उजाडला, तरी अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी पुढील प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

मी खालसा कॉलेजमधून टीवायबीएमएमची परिक्षा दिली आहे. मला पुण्याच्या FTII मधून डिरेक्शनचा कोर्स करायचा होता. मात्र अद्याप टीवायबीएमएमचा निकाल न लागल्यामुळे यावर्षी  मला FTIIला प्रवेश घेता आलेला नाही.

शशांक पाटील, विद्यार्थी

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. राज्यपालांनी निकालासाठी दिलेली ३१ जुलैची डेडलाईन विद्यापीठाला पाळता आलेली नाही. त्यानंतर ऑगस्ट उजाडला तरी अद्याप निकालाचा पत्ता नाही. एमएमसीसीला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने ८ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ दिलेली. मात्र ५ ऑगस्टलाही निकाल न लागल्यामुळे ही मुदत वाढवून १७ ऑगस्ट करण्यात आली आहे. मात्र १७ ऑगस्टपर्यंत तरी निकाल लागेल की नाही यात शंका आहे.

एमएससीला अॅडमिशन घेण्यासाठी विद्यापीठाने तारीख जाहीर केली खरी, पण अजून एमसीचा निकाल न लागल्यामुळे गोंधळ उडाला आहे. या आधी एमएससीच्या प्रवेशाची तारीख दोन वेळा वाढवण्यात आली. आता १५ ऑगस्टला निकाल लागला नाही, तर विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेशाची तारीख बदलावी, अशी विनंती आहे. नाहीतर आमचे एक वर्ष वाया जाईल.

निकीता पोफळी, विद्यार्थिनीहेही वाचा

आता तरी निकाल लावा हो!

विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा