Advertisement

विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?


विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?
SHARES

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी राज्यपालांनी दिलेली 31 जुलैची मुदत चुकल्यानंतर पुन्हा एकदा नवी मुदत देण्यात आली. 5 ऑगस्टपर्यंत निकाल लावावेत अशी नवी डेडलाईन दिली गेली. पण या नव्या डेडलाईनलाही निकाल लागणार नसल्याची माहिती कुलगुरुंनी दिली आहे. 31 जुलैची डेडलाईन टळल्यानंतरही अद्याप ३२४ निकाल बाकी आहेत. लॉ आणि कॉमर्सचे सर्व निकाल येत्या ४ दिवसात लावणे कठीण असल्याचं कुलगुरूंनी म्हटलंय. विद्यापीठाचे सर्व निकाल लागण्यासाठी १५ ऑगस्ट उजाडेल, असे कुलगुरूंचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या विद्यापीठात राज्यपाल विरूद्ध कुलगुरू असंच चित्र रंगताना दिसतंय.

राज्यपालांनी दिलेली 31 जुलैची डेडलाईन विद्यापीठ प्रशासन पाळू शकलं नाही. त्यानंतर ही मुदत वाढवून 5 ऑगस्ट करण्यात आली. मात्र विद्यापीठाला ही मुदतही पाळणं अशक्य असल्याचं कुलगुरुंनी उघडपणे सांगितल्यामुळे राज्यपालांच्या आदेशांचं कुलगुरुंना काही सोयरसुतक आहे की नाही? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. ही वाढीव मुदत नाकारतानाच आता सर्व निकाल लागायला 15 ऑगस्ट उजाडेल असंही कुलगुरुंनी सांगितलं आहे.

कुलगुरूंच्या याच मनमानी कारभाराला कंटाळून विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. या आधीही नीरज हातेकर यांनी विद्यापीठात सुरू असलेला अनागोंदी कारभार, प्राध्यापकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या, फेसबुकवर पोस्ट करून सगळ्यांसमोर आणल्या. विद्यापीठात सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे सध्या विद्यापीठात कुलसचिव, प्रकुलगुरू, परीक्षा आणि मूल्यमापन संचालक ही पदं रिक्त आहेत.

आदीत्य ठाकरे यांनी ट्वीटरवरून शिक्षण विभागाच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ३१ जुलै ही डेडलाईन संपली, तरी सर्व निकाल लागलेले नाही. असा कारभार याआधी कोणीही पाहिला नव्हता. हा लाजीरवाणा कारभार आहे. अशी टीका त्यांनी ट्वीटरवर केली आहे.






हेही वाचा

पेपर तपासणीचा वाद आला चव्हाट्यावर...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा